Monday, December 10, 2007

नाताळ

दुपारचे २ वाजले आहेत. नुकतेच जेवण झाले आहे. माझ्या आजू बाजूच्या चार cubes मधे कुणीही नाहीये आणि मला प्रचंड झोप येतेय. पण मी इथे झोपू शकत नाही. का तर म्हणे हा professionalism नाही. Recently एका Internet Survey नुसार IT क्षेत्रातील 20% लोकांनी हे मान्य केले की ते ऑफिस मधे झोपतात. पण मी झोपण्याचा विचार सोडून blog लिहायला घेतला.
गेल्या काही दिवसांत बरयाच गोष्टी 'घडल्या'. त्यात EAD कार्ड चे प्रोसेसिंग, नविन जॉब आणि नविन गाडी ह्या जगाला सांगण्यासारख्या गोष्टी... आणि मित्र-मैत्रिणींबरोबर चकाट्या पिटणे, केस कापणे, latest गाण्यांची CD बनविणे, कपडे आणि shoes विकत घेणे, train ने ऑफिसला जाणे, नविन बॉस बरोबर downtown मधे फिरणे अशा अनेक interesting गोष्टी करुन झाल्या. आता 2008 येई पर्यंत हे असंच चालणार. Holiday Season म्हणजे नुसती धमाल. सगळी कडे christmas चे रंगीबेरंगी डेकोरेशन, दुकानांमधे सेल, माणसांची धावपळ, खरेदी, खाणे-पिणे आणि वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणे... वर्षभरात 2080 तास काम केल्यानंतर कुणाला नाही आवडणार अशी मजा करायला?