नम्रता आणि सारिकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकून आणि माझ्या अपेक्षा अनेक पटीनी कमी करून मी 'जोधा अकबर' बघायला गेले आणि हृथिक रोशन च्या प्रेमात पडूनच थिएटर च्या बाहेर आले.
इतका हळूवार आणि तरल चित्रपट बनवल्याबद्दल आशुतोष गोवारिकर चे मनापासून कौतुक केले पाहिजे. चित्रपट बघताना अनेक प्रश्न मनात येता येता तसेच राहून गेले कारण पडद्यावर जे दिसत होतं ते इतकं सुंदर होतं, इतकं आकर्षक होतं की जे दिसतयं ते आधी बघावं आणि मग विचार करावा असंच वाटत राहिलं. थोडक्यात 'जहाँ-पन्हा का दिल दिमाग पे भारी हो गया ' :)
http://www.dhingana.com/album/hindi/latest/jodhaa-akbar/2898
Monday, February 25, 2008
Subscribe to:
Posts (Atom)