Tuesday, November 07, 2006
Reminiscence
आज मी आख्खी दुपार पक्ष्यांची चित्रे बघण्यात घालवली. मला आत्ता उठुन बर्ड वॉचिंगला जावस वाटतय. ऑफिस मधे काम करत असताना अनेकदा माझ्या मनात विचार येतात की मी कितीतरी गोष्टी अनेक दिवसात केल्या नाहियेत. मला माझ्या मैत्रिणींबरोबर मनसोक्त भटकायच आहे. अचानक मैत्रिणीचा फोन यावा आणि गाडी काढून निघाव अशी एक ट्रिप करायची आहे. ट्रेकिंग करायच आहे. माझ्या कायनेटिक वरुन लांबच लांब चक्कर मारताना गार वारा श्वासात भरुन घ्यायचा आहे. आईबरोबर बाल गंधर्व च्या कट्ट्यावर बसून गप्पा मारायच्या आहेत. नाटक बघायच आहे. पावसाळ्यात सह्याद्रिच्या रांगामधून फिरायच आहे. लहान लहान ओहोळात पाय बुडवून चालण्याच सुख परत एकदा अनुभवायच आहे. एकाच गाडीत कोंबून माझ्या बहिण-भावांबरोबर प्रवास करायचा आहे. मनाचा वेग चकित करणारा आहे. मी गेल्या ५ मिनिटांत US to India back and forth असंख्य ट्रिप्स मारुन आलेय.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment