Monday, July 02, 2007

Perspective


माझी अडीच वर्षांची भाची, सई, नुकतीच शाळेत जायला लागली आहे. तिच्या शाळेमुळे घरात सकाळी सकाळी प्रचंड गडबड असते (म्हणजे घरातले सगळे उगीच प्रचंड गडबड करतात).
पू (माझी वहिनी) सईला सोडायला शाळेत जाते आणि २ तास शाळेतच थांबते.
सई शाळेत गेल्यावर मोठ्ठा भोंगा पसरते. आज पू ला फ़ोन केला तर पू ने सांगितले की सई आता अजिबात रडत नाही. मी आश्चर्याने विचारलं की अचानक हा बदल कसा?
तर पू ने एक अफ़लातून ट्रिक शोधली आहे. शाळेत पोहोचल्यावर पू सई ला सांगते की, ’आपण इथल्या झाडांना पाणी घालायला आलो आहोत. तू तुझ्या मैत्रिणींबरोबर खेळ तोपर्यंत मी झाडांना पाणी घालते.’ हे ऐकून सई हसत हसत शाळेत जाते. कधी कधी मात्र पू ची ही थाप पचत नाही कारण धो धो पाऊस येत असतो. सई ला प्रश्न पडतो की एवढ्या पावसात झाडाला अजून पाणी कशासाठी? मग ’झाडाची cutting करायला आलोय’ अशी पू ची नविन थाप तयार असते.
एकंदर ’आई कामाला येताना आपल्याला घरी न सोडता बरोबर घेऊन आली आहे’ ही concept ’आपण शाळेत आलो आहोत’ यापेक्षा नक्कीच भारी वाटते ना?
मला पण ऑफिस ला जाताना असा ’नवा’ perspective शोधला पाहिजे.

1 comment:

Priya said...

great.. idea avadale. aaNe prespective suddha