Friday, September 01, 2006

वळण

आम्ही लॉन्ग वीकएन्ड साठी बॉस्टन ला जाणार आहोत. प बरोबर फ्लाईट मधे मस्त गप्पा मारता येतील ह्या विचाराने मला छान वाटतंय. त्याच्याबरोबर वेळ घालवायला मला नेहमीच आवडतं.
आपली आवडती माणसं बरोबर असली की वेळ कसा पटकन जातो नाही!
शाळेत असताना आम्ही मैत्रिणिंनी EsselWorld ला जाण्याचा plan बनवला होता. आमची अट एकच होती आम्ही ६ जणी कुठल्याही मोठ्या व्यक्तीला बरोबर न घेता जाणार.
तो plan कधीच successfull झाला नाही. पण आम्ही मैत्रिणी कुठेही भेटलो तरी तेवढीच धमाल करायचो. त्या काळात 'ठिकाण' महत्वाचं नसायचं.
शाळेच्या trips तर अगदीच फालतू असत. एका वर्षी आमची trip जव्हार आणि डहाणूला गेली होती. तिथला काळा समुद्र आणि दमट हवा कुणालाच आवडली नव्हती. पण ह्या गोष्टींचा विचार करायला तेव्हा वेळ कुठे होता! आम्ही सगळ्याजणी गप्पा, गाणी, खिदळणे आणि खाणे ह्यातच दंग असायचो.
भूगोलाच्या पुस्तकात कॅलिफोर्नियाच्या फळबागांची वर्णनं वाचून मात्र असं वाटायचं की एकदा तरी कॅलिफोर्नियाला जावं. दहावीत असताना शाळेने South India ट्रिप काढली. किती तरी सुंदर आठवणी बरोबर घेऊन आम्ही शाळेतून बाहेर पडलो. कॉलेजमधे गेल्यावर वाटायला लागलं की जगभर फिरावं. तेव्हाच्या ट्रिप्स वेग़ळ्या कारणांसाठी special आहेत आणि आता प बरोबरच्या ट्रिप्स् अजूनच वेगळ्या, सुंदर आणि exciting! आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला वेगळ्या गोष्टी हव्या असतात. ते वळण संपायच्या आत त्या त्या गोष्टींचा आस्वाद घ्यावा. पुढच्या वळणावर तुम्हाला काय आवडेल काही सांगता येत नाही.

No comments: