काही गाणी मनाला खोलवर स्पर्श करतात. त्यातल हे एक गाण.
अचानक जुन्या आठवणीमधे ओढून नेणार.
कवी ग्रेस चे शब्द, हृदयनाथाच सन्गीत आणि लताचा आवाज ह्या तीन गोष्टीनी कुणी मन्त्रमुग्ध नाही झाल तरच नवल!
त्यात ऐश्वर्या नारकर ने साकारलेली महाश्वेता डोळ्यासमोर उभी राहते. बर अल्फा टी व्ही च्या सिरीयल्स आणि घर हे एक पक्क समीकरण असल्यामुळे हे गाण मला नकळत घरी कधी घेऊन जात हेच कळत नाही. आत्ता आई जवळ असती तर दोघीनी हे गाण किती एन्जॉय केल असत! असो.
मला वाढदिवसाची भेट म्हणून हे गाण दिल्याबद्दल थॅन्क्स टू सिद्धार्थ!
आणि मला हे गाण ऐकायला एक छानसा आयपॉड दिल्याबद्दल थॅन्क्स टू प.
भय इथले सम्पत नाही
मज तुझी आठवण येते
मी सन्ध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते
ते झरे चन्द्र सजणाचे
ती वरती भगवी माया
झाडाशी निजलो आपण
झाडात पुन्हा उगवाया
तो बोल मन्द हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अन्गी राघव शेला
स्तोत्रात इन्द्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता सम्पत नाही
चान्दणे तुझ्या स्मरणाचे
भय इथले सम्पत नाही
Friday, September 08, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
नेटवर 'भय इथले' शोधत होते. तुमच्या ब्लॉगवर सापडलं. I was looking for this for long. Thanks for posting whole lyrics!
Post a Comment